Project
प्रकल्पाचे नाव – बेदाणा उत्पादक शेतकरी विकास प्रकल्प
लाभार्थी घटकाचे नाव : शेतकरी
प्राधान्याने १००० शेतकरी एका क्लस्टर मधून निवड करणे आणि त्यांना व्यावसायिक स्तरावर ४ दिवसांचे “बेदाणा उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन” या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये द्राक्ष बाग लागण करणेपासून काढणी पश्चात बेदाणा निर्मिती करणे असा सर्व अभ्यासक्रम या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेला आहे. एका महिन्यात १० निवडक बाजारपेठेच्या ठिकाणी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. उदा. तासगाव जि.सांगली येथे ५००० किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये संपुर्ण तालुका व्यापला जाऊन हा प्रकल्प राबविला जात आहे. तक्ता क्रमांक ०१ मध्ये गावाच्या आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे.
“बेदाणा उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन” या विषयाचे प्रशिक्षण घेऊन कुशल शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला ठोक / हमीभाव आणि आवश्यक सर्व सेवा देण्यासाठी सुरुवातीला करार करून उत्पादने घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम वा अन्य कोणत्याही धोक्यांची तीव्रता जवळपास ७०% पर्यंत कमी झालेली आहे.
लाभार्थी घटकाचे नाव : ग्रामीण महिला व्यवसाय गट
प्रकल्प क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांना ४ दिवसांचे “व्यवसाय व्यवस्थापन” प्रशिक्षण दिले जाते. अंगभुत कौशल्ये विकास, स्थानिक परिस्थितीतील गरजांचा व्यावसायिक स्तरावर वापर, उपलब्ध संसाधने व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन यासोबत उत्पादन, व्यापार आणि सेवा इत्यादी विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेले आहे. (सविस्तर अभ्यास साहित्य सोबत जोडले आहे. पान नं. ___ ते पान नं. ____) प्रकल्प क्षेत्रातील गावे आणि तेथील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०१ मध्ये गावाच्या आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर मुल्यवर्धन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जात आहे.
लाभार्थी घटकाचे नाव : शहरी महिला व्यवसाय गट
प्रकल्प क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांना ४ दिवसांचे “व्यवसाय व्यवस्थापन व संवाद कला” या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. अंगभुत कौशल्ये विकास, स्थानिक परिस्थितीतील गरजांचा व्यावसायिक स्तरावर वापर, उपलब्ध संसाधने व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन यासोबत उत्पादन, व्यापार आणि सेवा इत्यादी विषयांचा सविस्तर अभ्यासक्रम या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेले आहे. (सविस्तर अभ्यास साहित्य सोबत जोडले आहे. पान नं. ___ ते पान नं. ____) प्रकल्प क्षेत्रातील गावे आणि तेथील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०२ मध्ये गावाच्या आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर मुल्यवर्धन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जात आहे.
Comments
Post a Comment