गोएक्स्पोर्ट (नेदरलंड) आणि सोलापुर अग्रो उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम भेंडी गुणवत्ता नियंत्रण कार्यशाळा संपन्न
"गो एक्सपोर्ट" कंपनीमार्फत संचालक श्री. प्रकाश पाटील उपस्थित होते आणि माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानकडून महेश बोरगे, रावसाहेब देशमुख, संदीप तोडकर यांनी मार्गदर्शन केले. रावसाहेब देशमुख यांनी भेंडी लागवडीपासून काढणीपर्यंत उदा.माती परीक्षण, बियाणे निवड, निविष्ठा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. निर्यातीसाठी आवश्यक असणारे 'ग्लोबल ग्याप' प्रमाणीकरण व त्यासाठी प्रत्येक स्तरावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी श्री. संदीप तोडकर आणि त्यांच्या कष्टाने उभे केलेल्या ' तन्मय हायटेक' या व्यवसायाची आधी केले मग सांगितले या तत्वावर स्वतःची यशोगाथा उपस्थित शेतकऱ्यांना सांगितली. सन २०११ मध्ये १० गुंठे पडीक जमिनीत सुरु केलेली आधुनिक शेती आणि सध्याचे " तन्मय हायटेक "च्या माध्यमातून घेतेलेले परदेशी फळ भाजीपाल्यांचे उत्पादन घेताना आलेल्या अडचणी, माझीशेती आणि कृषी विभाग यांच्या सहाय्यान