Participate Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps बेदाणा उत्पादक शेतकरी गट “बेदाणा उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन” या विषयाचे प्रशिक्षण घेऊन कुशल शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला ठोक / हमीभाव आणि आवश्यक सर्व सेवा देण्यासाठी सुरुवातीला करार करून उत्पादने घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम वा अन्य कोणत्याही धोक्यांची तीव्रता जवळपास ७०% पर्यंत कमी झालेली आहे. ग्रामीण महिला व्यावसायिक गट प्रकल्प क्षेत्रातील गावे आणि तेथील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०१ मध्ये गावाच्या आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी स्थानिक स्तरावर मुल्यवर्धन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जातो. शहरी महिला व्यावसायिक गट प्रकल्प क्षेत्रातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम, महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०२ मध्ये शहरे आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी महिलांना आणि गृहिणींना स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण अन्नधान्य, भाजीपाला, फळे असे सर्व किचन उपयोगी साहित्य उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जात आहे. कर्मचारी New - ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पच्या 'बेदाणा उत्पादक शेतकरी विकास उपक्रमामध्ये पदभरती जाहिरात (१८०४०३) Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment