Posts

Showing posts from April, 2018

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक

Image
बेदाणा क्लस्टर विकास उपक्रम  पार्श्वभूमी : माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता  शेतकरी ,  महिला  आणि  तरुण  यांच्या सर्वांगीण विकासासाठी  ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प  राबविला जातो. शेतकरी बांधवांना शेती पिक उत्पादन पद्धती  मार्गदर्शना सोबत तयार झालेला शेतमाल विक्री करिता सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. परिणामी गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उत्पादनाचे अंतिम ध्येय गाठता येते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला फळे - भाजीपाला पूरक विक्री व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीने विकला जातो. बाजारपेठेचे नियोजन नसल्यामुळे बाजारातील आवक वाढल्यास व्यापारी शेतमालास योग्य भाव देऊ शकत नाहीत. यासंपुर्ण एकमेकांना पूरक बाबींचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर माझीशेती संस्था प्रत्यक्षात कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, बँक (आर्थिक / वित्तीय संस्था), शेतकरी, ग्रामीण व शहरी बचत गट, सेवा पुरवठादार यांच्या सहकार्याने परिपुर्ण विक्री व्यवस्था ज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव तर देता येईलच पण ग्राहकांना पोषक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने