माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचा बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमातून ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम - श्री. संजय माळी, प्रकल्प व्यवस्थापक

बेदाणा क्लस्टर विकास उपक्रम पार्श्वभूमी : माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान मार्फत ग्रामीण भागाच्या विकासाकरिता शेतकरीमहिला आणि तरुण यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प राबविला जातो. शेतकरी बांधवांना शेती पिक उत्पादन पद्धती मार्गदर्शनासोबत तयार झालेला शेतमाल विक्री करिता सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते. परिणामी गुणवत्तापूर्ण आणि पोषक आहार उत्पादनाचे अंतिम ध्येय गाठता येते. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला फळे - भाजीपाला पूरक विक्री व्यवस्था नसल्याने कवडीमोल किमतीने विकला जातो. बाजारपेठेचे नियोजन नसल्यामुळे बाजारातील आवक वाढल्यास व्यापारी शेतमालास योग्य भाव देऊ शकत नाहीत. यासंपुर्ण एकमेकांना पूरक बाबींचा अभ्यास केल्यानंतर प्रायोगिक तत्वावर दोन वर्षे प्रकल्प चालविल्यानंतर माझीशेती संस्था प्रत्यक्षात कृषी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये, बँक (आर्थिक / वित्तीय संस्था), शेतकरी, ग्रामीण व शहरी बचत गट, सेवा पुरवठादार यांच्या सहकार्याने परिपुर्ण विक्री व्यवस्था ज्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव तर देता येईलच पण ग्राहकांना पोषक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने पोहोच करणे सोपे जात आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि उपजीविका विकास हा एक प्रमुख विषय पुर्ण होताना दिसत आहे. 


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमाची सुरुवात व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षणाने : ग्रामीण भागात उपलब्ध मनुष्यबळाची आवश्यकता पाहुन व्यवसाय कसा सुरु करायचा आणि सुरु केलेला सुस्थितीत चालण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची याचे प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाते. एकूण २ दिवस अभ्यासक्रम + १ प्रात्यक्षिक असे ०३ दिवसांमध्ये शेतकरी, तरुण आणि महिलांना माहिती तंत्रज्ञानाचा व्यवसायामध्ये वापर, नेतृत्वकला, संवादकला, उत्पादन - व्यापार - सेवा यामधील फरक आणि पद्धत, जमा - खर्च, मनुष्यबळ व्यवस्थापन, विमा संरक्षण, मूल्यवर्धन आणि विक्री व्यवस्थापन, सोबत शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. परिणामी सहभागी घटकांचे मनोबल वाढते आणि इच्छित साध्य करणे सोपे जाते.




बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये शेतकऱ्यांना मिळणार उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव : 

माझीशेतीच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या सहाय्याने प्रतिवर्षी किमान ५०० व कमाल १००० शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाते. एकुण २ (अभ्यासक्रम) + १ (प्रात्यक्षिक) असे ०३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शासकीय मदत आणि प्रोत्साहन योजना असे अतिशय मुलभुत शेती व्यवसायकरिता आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत होते. शिवाय उत्पादन होण्यापुर्वीच शेतकऱ्यांच्या मालाचा दर ठरत असल्यामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे. एकंदरीत प्रती शेतकरी एक एकर द्राक्षबाग गृहीत धरल्यास १००० एकर द्राक्षबाग आणि त्यापासुन सरासरी ०५ ते ०६ टन प्रती एकर बेदाणा उत्पादन गृहीत धरून शेतकऱ्यांना सरसकट उत्पादन खर्चावर आधारित हंगामी हमीभाव रु. १२० प्रति किलो दिला जातोय.


बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गटांना रोजगाराचा पर्याय : बचत गट चळवळ महाराष्ट्राला नवीन नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बचत गट सर्व बाजुने सक्षम आहेत, अगदी आर्थिक साक्षरता आणि सक्षमता बाबतीतही इथले बचत गट कमी नाहीत. बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये बचत गट प्राधान्याने सहभागी करून घेतले जातात. बचत गटांना एकत्रित करून त्यांना बेदाणा प्रतवारी, वेष्टन, विक्री व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित झालेल्या बचत गटांना व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञान सहकार्य घेणे, बेदाणा ग्राहक आणि उत्पादक शेतकरी नोंदणी करणे, प्रतवारी आणि वेष्टन करणे, बाजारपेठ शोधणे आणि विक्री करून वेळोवेळी अहवाल जतन करून ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून बचत गटांना सरासरी रु. १,००,००,०००/- वार्षिक नफा किंवा रोजगार निर्मिती होते. 

बेदाणा क्लस्टर विकास उपक्रमामध्ये माझीशेतीची भुमिका : 
संस्थेचे वेगवेगळ्या भागातील तज्ञ कार्यरत मनुष्यबळ साधन सुविधा पुरवण्याचे काम करते. प्रशिक्षण देऊन लाभार्थी घटकांना सक्षम करणे हे माझीशेतीचे प्रथम प्राधान्याचे काम आहे. माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानच्या 'ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्प निधीतून प्रति लाभार्थी अंदाजित रु. ३६५ खर्च करून १००० शेतकरी, २५०० बचत गटाचे सदस्य असे एकूण ३५०० लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रति वर्ष रुपये १२,७७,५००/- लाख प्रमाणे निधी तरतुद केलेली आहे.

Comments

  1. उपक्रम खूप चांगला आणि शेतकरी बांधवांच्या उपयोगाचा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, तुमचे प्रतिसाद आम्हाला लाख मोलाचे आहेत.

      Delete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment