Raisin Farmers Club

आमच्याकडे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना भौगोलिकदृष्ट्या आणि समन्वयाच्या दृष्टीने जवळच्या इतर छोट्या ग्रुपमध्ये सहभागी केले जाते. या ग्रुपची अधिकतम सहभागी शेतकरी संख्या ३० राहते. गरजेनुसार आणि अंमलबजावणी करिता वेळोवेळी ग्रुपमध्ये बदल केले जातात. उदा. पानंद भागातील 'अ' हा शेतकरी पवार खोऱ्यातील ३० सदस्य संख्या असलेल्या 'अरुणोदय' या गटामध्ये पुर्वीपासून सहभागी असेल. पवार खोऱ्यातील 'ब' हा शेतकरी अरुणोदय गटामध्ये सहभागी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे 'अ' या शेतकऱ्यास त्याच्या सोयीच्या ग्रुपमध्ये सहभागी केले जाते. त्यामुळे तयार झालेल्या जागेवर 'ब' हा शेतकरी समाविष्ट केला जातो. ज्याठिकाणी पुर्वीचा ग्रुप अस्तित्वात नाही त्या ठिकाणी 'अ' या शेतकऱ्यास नवीन ग्रुप बनविण्यास सांगितले जाते व त्यांना त्या गटाचे प्रतिनिधित्व दिले जाते. 

नवीन सहभागी झालेल्या प्रथम '३०' शेतकऱ्यांना सोयीच्या ठिकाणी व्यावसायिक स्तरावर ४ दिवसांचे “बेदाणा उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन” या विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये द्राक्ष बाग लागण करणेपासून काढणी पश्चात बेदाणा निर्मिती करणे असा सर्व अभ्यासक्रम या प्रशिक्षणामध्ये समाविष्ट केलेला आहे. (सविस्तर अभ्यास साहित्य पाहण्यासाठी इथे क्लिक करा.) 

“बेदाणा उत्पादन आणि विक्री व्यवस्थापन” या विषयाचे प्रशिक्षण घेऊन कुशल शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला ठोक / हमीभाव आणि आवश्यक सर्व सेवा देण्यासाठी सुरुवातीला करार करून उत्पादने घेतली जातात. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक, कृत्रिम वा अन्य कोणत्याही धोक्यांची तीव्रता जवळपास ७०% पर्यंत कमी झालेली आहे. 

ग्रामीण महिला व्यावसायिक गट
प्रकल्प क्षेत्रातील गावे आणि तेथील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०१ मध्ये गावाच्या आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी स्थानिक स्तरावर मुल्यवर्धन करण्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जातो.

शहरी महिला व्यावसायिक गट
प्रकल्प क्षेत्रातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यापार आणि सेवा क्षेत्राशी संबंधित उपक्रम, महिलांचे एकजिनसी व्यावसायिक गट बनवून त्यांच्यामार्फत राबविले जातात. तक्ता क्रमांक ०२ मध्ये शहरे आणि लाभार्थी घटकाचे विश्लेषण दिले आहे. परिणामी महिलांना आणि गृहिणींना स्थानिक स्तरावर गुणवत्तापूर्ण अन्नधान्य, भाजीपाला, फळे असे सर्व किचन उपयोगी साहित्य उपलब्ध होते. तसेच मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्तर उंचावला जात आहे.

कर्मचारी

Comments